वॉशिंग्टन – अमेरिकेने बुधवारी लाल समुद्रातील जहाजांवर हौथींचे हल्ले उधळून लावले. येमेनमधील हौथी-नियंत्रित भागात स्वसंरक्षण म्हणून सात मोबाइल अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले.
अमेरिकेच्या सैन्याने दुपारी १ ते संध्याकाळी ७.३० दरम्यान हौथींच्या पायाभूत सुविधा आणि उपकरणांवर यशस्वी हल्ले केले. हल्ल्यात, अमेरिकेच्या लष्कराने येमेनच्या हौथी-नियंत्रित भागात सात मोबाइल अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे, तीन ड्रोन आणि एक मानवरहित स्फोटक जहाजांना लक्ष्य केले.
ही सर्व जहाजे, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्र लाल समुद्रातील जहाजांना आणि अमेरिकेच्या जहाजांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही नष्ट केली गेली असल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
मागील आठवड्याच्या सुरुवातीला, अमेरिकेने अनेक हौथी क्षेपणास्त्रांविरूद्ध नव्याने स्व-संरक्षणासाठीचे हल्ले केले आहेत. त्यामुळे या प्रदेशातील अमेरिकेच्या नौदलाची जहाजे आणि व्यापारी जहाजांना धोका होण्याची शक्यता होती.