बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्यूटी क्वीन उर्वशी रौटेलाने सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. “व्हर्जिन भानुप्रिया’ 16 जुलैला प्रदर्शित होत आहे. ट्रेलरला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले आहे.
या चित्रपटात उर्वशी एका अनोख्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार असून त्यासाठी तिने मानधनाची रक्कमसुद्धा वाढवल्याचं कळतंय. इतर कलाकारांच्या तुलनेत उर्वशीने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली आहे. उर्वशीने ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटासाठी तब्बल सात कोटी रुपये मानधन घेतले आहे.