मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. तसं जरी असलं तरी तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आता याचमुळे ती ‘खतरों के खिलाडी’ या शो मध्ये दिसणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल खुलासा केला आहे.
लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं 13 वं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या पर्वासाठी या कार्यक्रमाची टीम स्पर्धकांच्या शोधात आहे. आणि यासाठी त्यांनी उर्फी जावेद हिची निवड केल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’ च्या टीमने उर्फी जावेदला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली आहे.
इतकंच नाही तर उर्फीने देखील तिचा होकार कळवला आहे. त्यांचा करार निश्चित झाला तर उर्फी लवकरच आफ्रिकेला या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. सोशल मीडियावर उर्फीचा मोठा चाहता वर्ग असून, अभिनेत्री रोज आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. दरम्यान, उर्फी पाठोपाठ रोहित शेट्टीने ‘खतरों के खिलाडी 13’ साठी शिव ठाकरेला देखील विचारणा केली असल्याचं सांगण्यात आलं होत.