नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील आपल्या १६ उमेदवारांची पहिली यादी समाजवादी पक्षाने जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचेही यादीत नाव असून त्यांना त्यांच्या मैनपुरी मतदार संघातून तिकिट देण्यात आले आहे.
बदायुं येथून धर्मेंद्र यादव, एटा येथून देवेश शाक्य, उन्नाव येथून अन्नू टंडन, लखनौ येथून रविदास मेहरोत्रा आणि अकबरपूर येथून राजराम पाल यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. संभळ येथून विद्यमान खासदार शफिकुर्रहमान बर्क यांच्यावर अखिलेश यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे तर फिरोजाबाद येथून अक्षय यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
खीरी येथून उत्कर्ष वर्मा रिंगणात असतील तर धौरहरा येथून आनंद बदौरिया, फर्रखाबाद येथून डॉ. नवल किशोर शाक्य, बांदा येथून शिवशंकर पटेल यांना तिकिट देण्यात आले आहे. फैजाबाद येथून अवधेश प्रसाद, आंबेडकर नगर येथून लालजी वर्मा, बस्ती येतून रामप्रसाद चौधरी आणि योगी आदित्यनाथ यांच्या गृह जिल्ह्यातून काजल निषाद यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.