नवी दिल्ली – भ्रष्टाचाराच्याबाबत जगभरातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक ९३ वा लागतो आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भातील २०२३ ची क्रमवारी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने आज जाहीर केली. याक्रमवारीतील बहुतेकदेशांच्या क्रमवारीमध्ये विशेष काहीही फरक पडलेला नाही.या क्रमवारीमध्ये एकूण १८० देशांमधील भ्रष्टाचाराचा आढावा घेण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार तज्ज्ञ आणि उद्योजकांच्या नजरेतून अभ्यासण्यात आला आणि ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. ही क्रमवारी लावताना ० ते १०० पर्यंतचे गुण देण्यात आले. यातील ० म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट आणि १०० म्हणजे कर्वात कमी अथवा शून्य भ्रष्टाचार असे गणित लक्षात घेतले गेले.
२०२३ मध्ये भारताचे एकूण गुण ३९, तर २०२२ मध्ये हेच गुण ४० इतके होते. २०२२ मध्ये भारत ८५ व्या क्रमांकावर होता. ३९ गुणांच्या आधारे भारताच्या कामगिरीमध्ये कोणतीही विशेष फरक पडलेला नसल्याचे आढळून आले. मा६ आगामी काळात निवडणुका होणार असल्यामुळे भारतातील नागरी जागा आणखीन संकुचित केली जाऊ शकते. विशेषतः दूरसंचार विधेयक मंजूर झाल्यामुळे मूलभूत हक्कांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
आशिया खंडामध्ये १३३ व्या क्रमांकावरील पाकिस्तान आणि ११५ व्या क्रमांकावरील श्रीलंका हे दोन्ही देश कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आणि राजकीय अस्थिरता असलेले देश आहेत. मात्र या दोन्ही देशांमधील न्याय व्यवस्था परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहे, असेही म्हटले गेले आहे.
सर्वात कमी प्रगत देशांपैकी बांगलादेश (१४९) मध्ये गरिबी हळूहळू कमी होते आहे आणि जीवनमान उंचावते आहे. क्रमवारीत ७६ व्या क्रमांकावरील चीनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी धडक कारवाई केली गेली. आहे. तेथे गेल्या दशकभरात ३७ लाख सरकारी कर्मचार् यांना शिक्षा केली गेली आहे. मात्र तेथील कारवाईचा भर यंत्रणा स्वच्छ करण्यापेक्षा दोषींना शिक्षा करण्यावर आहे. त्यामुले या कारवाईचा परिणाम दीर्घकाळासाठी राहू शकणार नाही, असेही म्हटले गेले आहे.
आशिया -प्रशांत क्षेत्रातील बहुतेक देशांमध्ये २०२४ या वर्षात निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये भेरष्टाचार हा मुख्य मुद्दा म्हणून गाजणार आहे. मात्र भेरष्टाचारावर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना न जाल्यामुळेया भ्रष्टाचाराचे प्रमाणही विशेष घटलेले नाही, असे निरीक्षण देखील या अहवालामध्ये नोंदवण्यात आले आहे.
न्यूझिलंड, सिंगापूरमधील भ्रष्टाचार कमी
न्यूझिलंड (३) आणि सिंगापूर (५) हे देश यादीमध्ये पूर्वीप्रमाणे वरच्या स्थानी राहिले आहेत. त्यांच्यापाठोपाठ भ्रष्टाचारावर कठोर उपाय योजना करणार् या देशांची वर्णी लागते. यामध्ये ऑस्ट्रेलिया (१४), हाँगकाँग (१४), जपान (१६), भूतान (२६), तैवान (२८) आणि दक्षिण कोरिया (३२) या देशांचा समावेश होतो. यादीतील तळाच्या देशांमध्ये दक्षिण कोरिया (१७२), म्यानमार (१६२), अफगाणिस्तान (१६२) यासारख्या हुकुमशाही असलेल्या देशांचा क्रमांक लागला आहे.