उन्नाव बलात्कार पीडितेचा अपघात

प्रकरणाची सीबीआय चौकशीची तयारी

लखनौ – उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडित युवतीचा काल रायबरेली जवळ संशयास्पद अपघात झाला आहे. या घटनेत सदर युवती गंभीर जखमी झाली असून तिच्या दोन महिला नातेवाईक ठार झाल्या आहेत. विरोधी पक्षांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. जर विनंती आली तर या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची राज्य पोलिसांची तयारी आहे असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी केले आहे.

या युवतीवर भाजपच्या आमदाराने बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. दरम्यान राज्य सरकारने या पीडितेवरील उपचाराचा सारा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. राज्याचे पोलिस दल या अपघाताची सविस्तर चौकशी करीत आहे. मुलीच्या कोणी नातेवाईकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तरी आमची त्याला तयारी आहे असे पोलिस महासंचालकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.