“जोपर्यंत मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले जात नाहीत तोपर्यंत…”; अफगाणिस्तानच्या शाळकरी मुलांचे धाडसी पाऊल

काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने आली आहेत. तालिबान्यांनी राजकारणापासून ते शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने फतवे काढले आहेत. तालिबान्यांनी शाळकरी मुलींना शाळेत स्वत: उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे. मात्र आता या निर्णयाविरोधात तेथील शाळकरी मुलांनीएक धाडसी निर्णय घेत आपली  भूमिका  तालिबान्यांसमोर मांडली आहे.

एकजूट दर्शवण्यासाठी काही शाळकरी मुलांनीदेखील शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.  एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील काही शाळकरी मुलं घरीच थांबली असून जोपर्यंत मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले जात नाहीत तोपर्यंत आपणही शाळेत जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय रोहुल्लाहने म्हटलं आहे की, “महिलांमुळे समाज पूर्ण होतो. जोपर्यंत मुलींसाठीही शाळा उघडल्या जात नाहीत तोवर मीदेखील जाणार नाही”.

“मुली सकाळी तर मुलं संध्याकाळी अभ्यास करतात. मुलांसाठी पुरुष शिक्षक असून मुलींसाठी महिला शिक्षक आहेत,” अशी माहिती एका शिक्षकाने दिली आहे. दरम्यान काही शिक्षकांनी सांगितल्यानुसार, ज्या मुलींचा उत्साह कमी आहे त्या अजूनही शाळा सुरू करण्यासंबंधी विचार करत आहेत.

“मुली शिकल्यामुळे पिढ्या घडत असतात. मुलाच्या शिक्षणाचा कदाचित कुटुंबाला फरक पडतो. मात्र मुलीच्या शिक्षणाचा परिणाम समाजावर होतो,” असं शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितलं. मुलींना शिक्षण मिळावं आणि त्यांनी ते पूर्ण करावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.