केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर

मोबाइल अॅपवर याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ चा अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूचक असणारा हलवा सोहळा काल नवी दिल्ली येथे पार पडला. दरवर्षी अर्थसंकल्पीय तयारीची लॉक-इन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी परंपरागत हलवा सोहळा पार पाडला जातो.

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार असून यावेळी हा अर्थसंकल्प प्रथमच कागदविरहीत स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. या प्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी निर्माण केलेल्या एका मोबाइल अॅपचं उद्घाटन केले.

अर्थसंकल्पाशी संबधित सर्व घटक या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांचं १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर मोबाइल अॅपवर याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.