अखेर शरद पवारांनी उघड केली खंत; लढाईच्या वेळी पक्ष सोडणाऱ्यांना म्हणाले…

मुंबई – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात राजकीय नेत्यांची मेगाभरती झाली होती. या मेगा भरतीचा फटका त्यावेळी विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बसला होता. त्यातही राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि विद्यमान आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व्यथित झाले होते. शरद पवारांनी त्यावेळीं झालेल दु:ख एका कार्यक्रमात व्यक्त केले.

राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा त्यांच्यावर सोपविली. तरीही, पक्षाला सोडून गेले. अनेक जण सोडून गेले मात्र काही फरक पडला नाही. पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाल्याचे म्हणत शरद पवार यांनी एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि आता भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर टीका केली. पवारांचा रोख यावेळी भाजपनेते मधुकर पिचड यांच्यावर होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड भाजपमध्ये गेले होते. मात्र वैभव पिचड यांना विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

अकोले तालुक्यातील शेंडी गावात  माजी आमदार दिवंगत यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावर शरद पवार यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून चौफेर टोलेबाजी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पक्षात आलेल्या सर्वांना भरभरून दिले होते. काही जणांना राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली पण तरीही ते पक्षाला सोडून गेले. अनेकजण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला’, असं म्हणत शरद पवार यांनी मधुकर पिचड यांच्यावर टीका केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.