पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्धाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. विलास आढाव, डॉ. मानसी गोरे उपस्थित होत्या.
विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात दरवर्षी असे प्रदर्शन भरविण्यात येते. यावर्षीही लोकांमध्ये अर्थसंकल्पाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व विभागातील विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाच्या विविध बाबी इतरांना समजावून सांगता याव्यात व तशी कौशल्ये त्यांच्यात विकसित करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणे परिसरातील महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्यांचे अभिप्राय नोंदविले.