नवी दिल्ली – तंत्रज्ञान संस्था काशा आणि युनायटेड मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्तरीत्या युनिकास नावाची क्रिप्टो बॅंक सुरू केली आहे. या बॅंकेतून क्रिप्टो करन्सी आणि सर्वसाधारण नोटांचे व्यवहार करता येतील.
सुरुवातीला ऑनलाइन व्यवहार व्यवहाराबरोबरच राजस्थान, गुजरात आणि दिल्ली राजधानी प्रदेशातील 14 शाखांच्या माध्यमातून व्यवहार करता येतील. 2022 पर्यंत 100 शाखा उघडण्यात येतील. प्रत्यक्ष शाखांतून क्रिप्टोकरेन्सीचे व्यवहार करता येऊ शकणारी जगातील ही पहिलीच बॅंक आहे.