वाघोली – पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाच्या योजना समितीच्या सदस्यपदी सरपंच गटातून स्वप्नील उंद्रे यांची निवड झाली असून निवडीबद्दल हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, रोहिदास उंद्रे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, दादासाहेब फराटे, हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे तसेच भाजपच्या तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मंडळींनी केलेल्या कामाची प्रचीती म्हणून स्वप्नील उंद्रे यांची सदस्यपदी निवड झाल्याने असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.
तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पंचायत समितीच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये या पूर्वी पाहायला मिळत होते. पीएमआरडीए चा निवडणुकीतून तालुक्यात वाढू लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहकार क्षेत्रातल्या तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप वेगळी प्रतिमा निर्माण करू शकेल असा विश्वास या निवडणुकीतून व्यक्त होऊ लागला आहे.
ग्रामीण भागात देखील भाजप आपली वेगळी ताकत पणाला लावून यश संपादन करत असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
माजी मंत्री संजय भेगडे, अध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार राहुल कुल, रोहिदास ऊंद्रे राज्य व जिल्हा पातळीवरील भाजपच्या पदाधिकारी वर्गाने घेतलेल्या परिश्रमाचे प्रतीक म्हणून ही निवडणूक पहावी लागेल. या निवडणुकीत भाजपने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. मतदारांनी भाजपला दाखवलेला विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतो.
प्रदीप दादा कंद
भाजप नेते, पुणे जिल्हा