बेहिशेबी मालमत्ता प्रकरण; नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर गुन्हा

एसीबीची कारवाई

पुणे – राज्याच्या नगररचना विभागातील नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय.53) यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्यापारकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ने गुरुवारी सकाळी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्तीला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या पुण्यातील कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटीतील घरी तसेच इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मालमत्तेची तपासणी सुरु आहे.

मागील 6 ते 7 महिन्यांपासून त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु होती. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे अंदाजे 2 कोटी 75 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. त्याचे स्पष्टीकरण ते देऊ न शकल्याने शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भष्ट्राचारातून कमाविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.