मुंबई- पाठीच्या कण्यावरील संशोधनातून जगविख्यात झालेल्या डॉ प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित “ताठकणा या चित्रपटात उमेश कामत प्रेमानंदची महत्वाची भूमिका साकारणार आहे.या चित्रपटात त्याच्या बरोबर अभिनेत्री सायली संजीव असणार आहे.
चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत त्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे .उमेश कामत फार चित्रपटात काम करत नाही. काही निवडच चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.
आणि काय हवं? बेवसिरिजमध्ये त्याने भन्नाट कामगिरी बजावली . यातील त्याच्या पात्रावर चाहत्यांनी विशेष प्रेम केल. अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश या दोघांनी वेबसिरीजच्या पहिल्या सिझनमध्ये धम्माल आणली. ते सिझन प्रचंड लोकप्रिय ठरल्यानंतर त्यांनी दुसरं सिझन करण्याचा विचार केला होता. दुसऱ्याही सिझनला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. आता या आगामी भूमिकेत उमेश नेमकं काय करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.