Entertainment – मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). सध्या तिचे ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक चर्चेत आहे. याच नाटकाच्या दौऱ्यासाठी प्रिया आणि उमेश कामत (Umesh Kamat) टीमसोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. तेथील काही फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिच्या बोल्ड लुकने अनेकांची मनं जिंकून घेतली आहे.
प्रिया बापटने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती पाण्यात उभी असल्याचे दिसत आहे. प्रियाचा हा हॉट अंदाज सगळ्यांनाच आवडला आहे. या पोस्टला तिने ‘वाईल्ड अँड फ्री’ असं कॅप्शन दिले आहे. ती ऑस्ट्रेलियामध्ये मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसत आहे. या लुकमध्ये देखील ती फारच सुंदर दिसत असून तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. ‘खुपच सुंदर’, ‘जबरदस्त फिटनेस’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र बराच काळ या दोघांनी एकत्र काम केलेले नव्हते. त्यानंतर आता दोघे ‘जर तरची गोष्ट’या नाटकाच्या माध्यमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. इरावती कर्णिक लिखित ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामतसह आशुतोष गोखले, पल्लवी अजय हे कलाकार आहेत.