INDvAFG 2nd T20 : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. त्याने अनेक विक्रम केले आहेत. हिटमॅनने पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे. त्या रेकॉर्ड्सवर एक नजर टाकूया…
(1) 36 वर्षीय रोहित सलग 10 द्विपक्षीय T20 मालिका जिंकणारा जगातील दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी सरफराजने हा विक्रम केला होता. अफगाणिस्तानवरील मालिका विजय हा कर्णधार म्हणून रोहितचा 12वा द्विपक्षीय T20 मालिका विजय होता. हा देखील एक नवा विक्रम आहे.
(2) यासह त्याने कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 72 सामने खेळले आणि 41 जिंकले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 53 सामने खेळले असून 41 जिंकले आहेत. विराट कोहली 50 सामन्यातील 30 विजयासह तिसऱ्या स्थानावर तर हार्दिक पांड्या 16 सामन्यातील 10 विजयासह चौथ्या स्थानावर आहे. सुर्यकुमार यादव 7 सामन्यातील 5 विजयासह पाचव्या स्थानावर आहे.
#INDvAFG 2nd T20 : वेगवान गोलंदाज ‘अर्शदीप सिंग’च्या नावे नकोशा विक्रमाची नोंद…
दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व 10 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 15.4 षटकात 4 गडी गमावून 173 धावा केल्या आणि सामना सहा विकेटने जिंकला.