मुंबई – अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपची ताकद पणाला लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लटके या शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. रमेश लटके यांचे अकाली निधन झाल्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. भाकपचे मुंबई सचिव काॅ. मिलिंद रानडे, काॅ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकतीली शिवसेना ठाकरे गट उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
भाकपचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठींबा जाहीर केला. pic.twitter.com/DWZCcbONpn
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 12, 2022
पक्षात बंड करून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेत भाजपोसबत युती करुन सत्ता स्थापन केली. तेंव्हापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून खरी शिवसेना आमचीच असा दोन्ही गटाकडून दावा करण्यात येत आहे. दोन्ही गट नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही शक्तीप्रदर्शन करताना दिसले. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांची ताकद पणाला लागणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढत होणार असून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांचा भाजपला पाठिंबा असणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाला राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस या पक्षाचा पाठिंबा आहे. त्यातच आज भाकपने पाठिंबा दर्शविल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.