T20WorldCup – टीम इंडियाला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या जागी केएल राहुलकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून डार्शी शॉट ( ५२ धावा ) आणि निक रॉबसन ( ६४ धावा ) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी गमावून १६८ धावा केल्या आणि टीम इंडियासमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरात भारतीय संघाला १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार पद भूषविणाऱ्या केएल राहुल ( ७४ धावा ) यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली. राहुलच नाव सोडलं तर ऋषभ पंतने ९, दीपक हुडाने ६ आणि हार्दिक पांड्याने १७ धावा केल्या. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्यात आली होती.
मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजीत सुधारणा पाहायला मिळाली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दमदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले. याशिवाय वेगवान गोलंदाजीत हर्षल पटेलने २ गडी, तर अर्शदीप सिंगने ३ षटकात २५ धावा देत १ गडी बाद करण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियातील पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यातील फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला. ( Western Australia defeated India by 36 runs In second warm-up match T20 WorldCup 2022 )
पहिल्या सराव सामन्यात चांगली कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळाला नाही. त्याचबरोबर फिरकीपटू युझवेन्द्र चहललाही या सामन्यात आराम देण्यात आला होता. यानंतर आता भारतीय संघ १७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी एक सराव सामना खेळणार आहे. त्या सामन्यात भारतीय संघाचे सर्व मुख्य खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने अद्याप एकही सराव सामना खेळलेला नाही. त्याने काही षटकांत क्षेत्ररक्षण केले आहे मात्र अजून फलंदाजीत तो उतरलेला नाही.