पुणे – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जायीर झाला असून, यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. धंगेकर यांच्या विजयामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना यांचा मोठा वाटा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले होते. मात्र, बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करा लागला आहे. मविआचे धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनीविजयी झाले आहेत. दरम्यान, कसब्याच्या रणांगणात भाजपला पराभवाची धूळ चारुन राज्यात चर्चेत आलेले रवींद्र धंगेकर यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. याभेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यावेळी उद्धव ठाकरेंनी रवींद्र धंगेकर यांचं विशेष कौतुक देखील केलं. “साधारण 30 वर्षांपासून भाजपचा असलेला बालेकिल्ला भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी केवळ पुणेकरांनाच नाही, केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशातल्या जनतेला दिला. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही याच पद्धतीने काम करुन आगामी निवडणुका जिंकुयात’. असं उद्धव ठाकरे म्हणाले.