मुंबई – शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यातून महाविकास आघाडीचे सरकार गेले. एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सोबत घेत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेला आपलं नाव आणि चिन्हही गमवावं लागलं. अशात शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याचे दिसून आले. यानंतर ठाकरे गटाला सर्वसामान्यांमधून मोठी सहानुभूती मिळत असून अनेक छोटे मोठ्या संघटना पाठींबा देताना दिसत आहेत. मराठी मुस्लिम संघाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांनी आपलं पाठींबा जाहीर केल्याचे समजते.
छोट्या मोठ्या संघटनांप्रमाणेच ठाकरेंच्या गटामध्ये विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होताना दिसून येत आहेत. त्यातच आता मातोश्रीवर जाऊन मुस्लिम सेवा संघाने ठाकरेंना आपला पाठींबा जाहीर केला आहे. आज देशामध्ये जातीधर्माचे राजकारण करून द्वेष पसरवणारे शिवसेनेला हिंदुत्व शिकवू लागले आहेत, पण उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदुत्व जपले आहे, अशा भावना यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फरीर मोहम्मद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यावेळी उद्धव ठाकरेंना एक पत्र देखील देण्यात आले.देशभक्त मुस्लिम बांधव नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे असे म्हणत ठाकरेंनी यावेळी पाठिंबा दर्शवणाऱ्या सदस्यांचे आभार मानले.प्रबोधन यात्रा असो वा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश ठाकरे गटाला सर्वसामान्यांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.