मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर

मुंबई – सिंधुदुर्ग येथील बहुचर्चित चिपी विमानतळाचा 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. पालकमंत्री मंत्री उदय सामंत यांनी निमंत्रम पत्रिका वाचून दाखवली त्यामध्ये दोघांच्याही नावांचा समावेश आहे.

सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांसह अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे. तसेच कोरोना पूर्णता: गेलेला नाही, त्यामुळे केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याचे सामंत यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे दुसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. या अगोदर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी कुडाळ येथे दोघे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.