नवी दिल्ली – आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना आता डिजिटल आरोग्य ओळखपत्र मिळणार आहे. आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत ही मोहीम राबवली जाणार असून त्यात लोकांना त्यांच्या आरोग्याचा सारा तपशील असलेले ओळखपत्र डिजिटल स्वरूपात देण्याची सोय करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात देशातील सहा केंद्रशासित प्रदेशांमध्येच ही योजना राबवली जाणार आहे. हे एक प्रकारचे नागरिकांचे आरोग्य खातेच आहे. हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज यांच्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे. आरोग्यसेवा पुरवणारी रुग्णालये आणि डॉक्टरांना रुग्णांच्या आरोग्याची ही तयार माहिती उपलब्ध होणार असल्याने त्यांच्यासाठी ही ईज ऑफ डुईंग बिझनेस सारखीच योजना आहे.
डॉक्टरांनाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे. डिजिटली उपलब्ध होणाऱ्यारुग्णांच्या माहितीमुळे एका क्लिकवर डॉक्टरांनाही त्यांच्या समोर उपस्थित असलेल्या रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीचा अंदाज घेता येणार आहे.