Lok Sabha Election 2024 : राज्यातील ज्या काही तीन चार मतदारसंघांवरून महायुतीचं घोडं अडलंय, त्यापैकी एक म्हणजे सातारा. सातारा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजेंनी तीन दिवस दिल्लीत तळ ठोकलाय. पण अद्याप त्यांच्या हाताला काही लागत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता उदयनराजेंचे टेन्शन वाढले आहे. । Udayanraje Bhosale | Rohit Pawar
दरम्यान, अश्यातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उदयनराजे भोसले यांना खोचक टोला लगावला असल्याचं दिसून आलं आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “भाजपचा एकही खासदार नाही ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला नाही. मराठी माणूस स्वाभिमानी असतो तो दिल्ली पुढे झुकत नाही.
बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा मातोश्रीवर तिकीट वाटप केले जायचे आता परिस्थिती वेगळी आहे. उदयनराजे यांना दोन ते दिन दिवस वेळ दिला जात नाहीत. मात्र एक खासदार असलेल्या पक्षाला वेळ दिला जातो. तुम्ही आमचे नेते घेऊ शकता, मात्र आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातील जनता विकत घेऊ शकत नाहीत. देशाला दाखवून द्यायचे आहे, त्यामुळे भाजपच्या प्रतिगामी विचाराला जिंकू देणार नाही”. असं रोहित पवार यावेळी म्हणाले. Udayanraje Bhosale | Rohit Pawar
माझा जनसंपर्क चांगला, तिकीट मलाच मिळावं – नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील म्हणाले की, ज्यावेळी उदयनराजेंसमोर लढण्यासाठी कुणीही तयार नव्हतं त्यावेळी पक्षाने आदेश दिला आणि मी निवडणूक लढवली. त्यामुळे आजही माझा दावा सातारा लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी अशी इच्छा आहे.
खासदार म्हणून मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागासह शहरी भाग, राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे.