पिंपरी – भरधाव वेगातील खासगी बसने धडक दिल्यामुळे बुलेटस्वार डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाकड येथे घडली.
ऐश्वर्या राजेश गरगट्टे (वय 26, रा. पिंपळे सौदागर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. मयत ऐश्वर्याने नुकतेच आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. सोमवारी सकाळी त्या आपल्या बुलेटवरून मैत्रिणीच्या घरून परत येत होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास सावित्रीबाई फुले उद्यानासमोर आल्या असता त्यावेळी हा अपघात झाला.