धुळे – धुळे तालुक्यातील नंदाणे गावालगत असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी- भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. सुंदरबाई समाधान होलार (वय 21, रा. नंदाणे) आणि भाची शिवानी आंबा होलार (वय 7, रा. नागद ता.चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सुंदरबाई ही भाचीला सोबत घेऊन गावालगत असलेल्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. सुंदरबाई कपडे धुत असतांना शिवानी पाय घसरून पाण्यात पडली. शिवानीला वाचवण्यासाठी सुंदरबाईने पाण्यात उडी घेतली. तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
जवळच्या शेतात गुरांना चारण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला तलावात दोन जणं पाण्यात पडल्याचे दिसले. त्याने आरडाओरडा केला. नातेवाईक आणि गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर मामी- भाचीला पाण्यातून बाहेर काढून त्यांना तत्काळ सोनगीर येथील ग्रमीण रुग्णालयत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषीत केले.