पुणे – तळवडे येथील आगीच्या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या दहा रूग्णांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील दोघींचा उपचारांदरम्यान शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांची एकूण संख्या आता आठवर गेली आहे.
प्रतिक्षा अशोक तोरणे (वय 16) आणि कविता गणेश राठोड (वय 45) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. तर शिल्पा राठोड (वय 31), अपेक्षा तोरणे (वय 26), रेणुका राठोड (वय 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), सुमन (वय 40), उशा पडवे (वय 40), प्रियंका यादव (वय 32) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रतिक्षा तोरणे ही सुमारे 95 टक्के भाजली होती. तर, कविता राठोड हिच्या फुफ्फुसात स्पार्कलचे कण गेले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.
“या घटनेतील अन्य चार रुग्णही 70 ते 90 टक्के भाजले आहेत. तर, अन्य चौघे जण 30 ते 40 टक्के भाजले असले, तरी स्पार्कल गेल्यामुळे त्यांची फुफ्फुस खराब झाली आहेत. त्यामुळे सर्वांची प्रकृती चिंताजनक असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.”- डाॅ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रूग्णालय