शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचा सुपुत्र,
सविंदणे – शिरूर तालुक्यातील भावेश अशोक माशेरे याची खो -खो स्पर्धत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याची महाराष्ट्राच्या खो -खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
नुकतेच नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय (१७ वर्षाखालील गट) खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्टाच्या संघाने गुजरातचा पराभव करीत दणदणीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र संघाचा कर्णधार भावेश याची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झाली आहे .
नाशिक येथे महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेचे आयोजन केले होते. भावेशच्या नेतृत्वाखाली जोरदार कामगिरी करत गुजरात संघाला धुळ चारली. भावेश यांनी चमकदार कामगिरी करीत आपली चुणूक दाखऊन दिली. भावेश हा पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या भोसे येथील मॉडर्न हायस्कुलचा विद्यार्थी आहे.
भावेश यांचे सर्व स्तरातुन कौतूक होत आहे. शिरूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भावेशचे वडील अशोक माशेरे हे आमदाबादचे माजी सरपंच असून ते नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, सरपंच दामूशेठ घोडे, वसंत पडवळ, विठ्ठल घावटे, माजी सभापती प्रकाश पवार, सरपंच सोनाली थोरात यांनी भावेश यांचे अभिनंदन केले आहे.