अवंतीपोरा भागात दोन अतिरेक्यांना कंठस्नान

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा भागात मंगळवारी अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर चकमकीत  लष्कराचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना ढेर केले आहे. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून दोन एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.

ठार झालेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची  माहिती मिळते आहे. अद्यापही चकमकी सुरू असल्याने दहशतवाद्यांचे मृतदेह सापडलेले नाहीत. अवंतीपोरा जिल्ह्यातील जनतारंगाच्या जंगलात ही चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर खारियू येथे शोधमोहीम राबविण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

या मोहिमेमध्ये सीआरपीएफ, भारतीय सैन्य, राष्ट्रीय रायफल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे कर्मचारी सहभागी आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. दरम्यान काल शोपियान जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत हिजबुल मिझाहिदीनचे तीन अतिरेकी ठार झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.