पुणे, ता. 16 ः कसबा पेठ परिसरात कोयत्याचा वापर करून दहशत पसरविणा-या दोन सराईतांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.
संकेत आनंत तारू (वय 19, रा. कसबा पेठ) आणि केतन संजय चव्हाण (वय 21, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील हे सहका-यांसह सोमवारी पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा दोन्ही आरोपी कसबा पेठ परिसरात कोयत्याचा वापर करून दहशत पसरवीत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस अंमलदार सयाजी चव्हाण, आकाश वाल्मीकी, रिझवान जेनिडी, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, मोहन दळवी, ऋषीकेश दिघे, राकेश क्षीरसागर, महंमद हनीफ शौकत शेख आणि मल्लिकार्जुन स्वामी यांनी ही कारवाई केली.