Kerala Election Result । शबरीमला मनपा जिंकत भाजपची दक्षिणेकडे विजयी वाटचाल

शबरीमला/केरळ – स्त्रियांना मंदिरात प्रवेश देण्याच्या प्रश्‍नावरुन देशभर गाजलेल्या शबरीमला येथील महानगर पालिकेच्या निवडणुकीत ( Kerala Election Result ) भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत केरलसह दक्षिणेत आपले विजयी अभियान सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी बृहन हैदराबाद निवडणुकीत आश्‍चर्यकारक यश मिळवल्यानंतर राजस्थान या कॉंग्रेसशासित राज्यातही भाजपाने पंचायत निवडणुकांत बाजी मारली होती.

उत्तरेकडे शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन पेटलेले असताना देशभर भाजपवर टीका करण्याची एकही संधी विरोधीपक्ष सोडत नसताना, दुसरीकडे दक्षिणेकडे भाजपा हळुहळू विजयी वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच पश्‍चिम बंगालमध्येही भाजपा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ( Kerala Election Result )

केरळमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पंचायत आणि महापालिका स्तरावरील या स्थानिक निवडणुका असल्या तरी याकडे देशातील राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. केरळच्या कम्युनिस्ट-प्रणित राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने इथे पूर्ण ताकत लावली आहे. भाजपा आघाडीने इथली शबरीमाला मंदिर परिसरातील महापालिका जिंकली आहे. ( Kerala Election Result )

फक्त सत्ताधारी एलडीएफचीच नाही, तर प्रतिस्पर्धी यूडीएफ आणि राजकीय जनाधार भक्कम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा प्रणीत एनडीएची इथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपाने यावेळी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अल्पसंख्यांकाना मोठया प्रमाणावर उमेदवारी दिली आहे. पंचायत स्तरावरील या निवडणुकीसाठी भाजपाने 500 ख्रिश्‍चन आणि 112 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.

पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांना महत्त्व आहे. केरळमध्ये दरवर्षी आलटून-पालटून एलडीएफ आणि यूडीएफची सत्ता येते. यावर्षी प्रथमच सत्ता कायम राखण्याचा एलडीएफचा प्रयत्न आहे.

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफने प्रथमच केरळ कॉंग्रेस एम शिवाय ही निवडणूक लढवली. राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेस कमकुवत झाली आहे. कॉंग्रेसच्या याच कमकुवत दुव्यांचा फायदा उचलण्याचा एलडीएफचा प्रयत्न असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कॉंग्रेसची कामगिरी कशी होते, त्यावर विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल. ( Kerala Election Result )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.