कामशेत येथे कंटेनरच्या धडकेत दोघे जखमी

चालकावर कामशेत पोलिसांत गुन्हा; जखमींची प्रकृती स्थिर
नाणे मावळ –
येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत हद्दीत गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सहारा कॉलनी परिसरात रस्ता ओलांडताना दुचाकीला कंटेनरची धडक बसून दोघे जखमी झाले आहे. अंकुश रघुनाथ लालगुडे (वय 35), विकास धोंडिबा हरफल (वय 33, रा. दोघेही अजिवली, ता. मावळ) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी (दि. 2) सायंकाळी पाचचच्या सुमारास कामशेत हद्दीत सहारा कॉलनी या परिसरात रस्ता ओलांडताना दुचाकी (एम.एच. 14 एफ.जी.1123) समोरुन भरधाव वेगात आलेल्या कंटेनरची (एम. एच. 46 ए.आर. 2469) धडक बसली. या अपघातात अंकुश रघुनाथ लालगुडे आणि विकास धोंडिबा हरफल हे जखमी झाले. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत गायकवाड तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.