प्रांताधिकारी संजय तेली : पंचायत समितीत “शीघ्र प्रतिसाद’ कक्षाची स्थापना
राजगुरूनगर – पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये शिरकाव केलेल्या करोना आजार हळूहळू पसरत आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील एका गावात परदेशातून आलेल्या दोन संशयित रुग्णांची मंगळवारी (दि. 10) पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये तपसणी करण्यात आली होती.
गुरुवारी (दि. 12) त्यांचे रिपोर्ट “निगेटीव्ह’ आले असून निगेटिव्ह आली आहे, तरीही खबरदारी म्हणून खेड पंचायत समितीत “शीघ्र प्रतिसाद कक्षा’ची स्थापना करण्यात आली आल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
करोनाचा संसंर्ग जन्य रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि जनजागृती करीता सर्व प्रशासकीय प्रमुखांसह, विविध शैक्षणिक, सामाजिक, स्वंयसेवाभावी संस्थाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत कार्यालयात शुक्रवारी (दि. 13) प्रांताधिकारी तेली यांनी घेऊन नियोजनाचा, खबरदारीच्या उपाय योजनाबाबतचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, खेड तालुका डॉक्टर असोशिएनचे अध्यक्ष डॉ. विलास काजळे, तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे, आळंदी रुग्णालय डॉ. जी. जी. जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. बी. कणकवले, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्रा. एस. एन. टाकळकर, मुख्याध्यापिका ए. एस. गुजराथी, जे. एस. ठाकूर, एस. एस. कांबळे, व्ही. के. खोमणे, संचिता ढवळे, उज्वला तांबे, एस. टी. बस आगार निरीक्षक महेश विटे, पी. एस. आय. भारत भोसले, कक्ष अधिकारी रमेश इष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, बाल प्रकल्प अधिकारी एस. टी. दुधाळकर, आरोग्य सहायक एन. एस. कांबळे, आर. बी. ढाकणे आदि उपस्थित होते.
सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच
एस.टी.ने अथवा इतर वाहनातून प्रवास करताना प्रवाशांनी खबरदारीचे उपाययोजना करुन प्रवास करावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याविषयी जास्तीत जास्त आपल्या परीसरातील घरातील कुंटुबापर्यत जनजागृती करण्यासाठी मदत घेण्यात येत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात येणाऱ्या अफवाबाबत पोलीस यत्रंणेमार्फत लक्ष ठेवले जात आहे.
गावपातळीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. करोन संसर्ग व्हायरस आजाराबाबत नागरिकांनी भीती न बाळगता योग्य ती काळजी घेऊन प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जाणऱ्या सूचना आणि उपाय योजनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.
आरोग्य यंत्रणा 24 तास सज्ज – गाढवे
संशयित करोना व्हायरसबाबत खेड तालुक्यात शोध मोहीम राबविण्यात येत असून परदेश गमन केलेल्या नागरिकांचा आणि सहप्रवाशाच शोध आणि माहिती सर्व वैद्यकीय डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यां मार्फत घेतली जात आहे.
यासाठी तालुकापातळीवर शीघ्र प्रतिसाद कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.आवश्यकते प्रमाणे संशयित प्रवाशांची वैद्यकीय निगराणीखाली तपासणी करून गरज आणि आवश्यकतेनुसार पुणे येथील नायडु हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रासह चांडोली, चाकण, आळंदी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वंतत्र बेडची व्यवस्था आणि आरोग्य यत्रंणा 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी सांगितले.
परीक्षेसाठी विभाग सतर्क
सध्या औषधांच्या दुकानातून मास्क आणि सेनिटायझर जास्त दराने विक्री केल्याच्य तक्रारी येत असून यावर स्वतंत्र यंत्रणा लक्ष ठेऊन आहेत. सध्या दहावीच्या परीक्षा 23 मार्च पर्यंत सुरू आहेत. परीक्षा सुरुळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांना आणि आरोग्य विभागांना सतर्क ठेवण्यात आले आहे.
आता सार्वजनिक कार्यक्रमावर “वॉच’
खेड तालुक्यात या पुढे होणारे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, गावांच्या यात्रात्सोव, लग्न समारंभ आदि ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
शहरातील आणि गावातील आठवडे बाजार, विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजनावर लक्ष ठेवण्याबरोबरच करोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्रशासकीय यत्रंणेच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात येत आहे.