पिरंगुट (वार्ताहर) – खेचरे (ता. मुळशी) येथील दरोडा प्रकरणातील दोन फरार आरोपीना पौड पोलिसांनी रविवारी (दि. 17) पहाटे तीनच्या सुमारास पाठलाग करून पकडले. अजय सतीश तोंडे वय 30) व प्रफुल्ल उर्फ बाबा मल्हारी जांभोरे (वय 28, दौघे रा. खेचरे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींनी नावे आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात खेचरे येथे चोरट्यांनी दरोडा टाकला होता. तेव्हापासून गुन्ह्यातील आरोपी गेल्या महिन्यांपासून फरार होते. हे आरोपी गावामध्ये असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव, आणि त्यांचे सहकारी आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता आरोपी बाजूच्या डोंगराच्या दिशेने पळून जात होते. मात्र, पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली. अधिक तपास पौड पोलीस करीत आहे.