पुणे – व्हाट्सऍपवर हत्यारासहीस स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. यातील एक तरुण सराईत गुन्हेगार आहे. या दोघांनीही तलवार व पालघन घेऊन काढलेली छायाचित्रे स्टेटसला ठेवली होती. दत्तवाडी पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांना अटक करण्यात आली. अमर लक्ष्मण गायकवाड(23,रा.जनता वसाहत) व भिमा शत्रुघ्न शिंदे(22, जनता वसाहत) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
दत्तवाडी पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार कुंदन शिंदे व पोलीस शिपाई प्रमोद भोसले यांना खबर मिळाली होती, तलवार आणी पालघनसारख्या हत्यारासह स्टेटस ठेऊन दोन तरुण जनता वसाहत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या सूचनेनूसार सापळा रचून दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार आण पालघन जप्त करण्यात आली.
त्यांच्यावर आर्म ऍक्टप्रमाणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमर गायकवाड हा दत्तवाडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो साथीदारांसह हत्यारे घेऊन त्याचे चित्रीकरण करुन व्हॉटस अप स्टेटस ठेवत होता. याप्रकरणाचा तपास पोलीस नाईक बजरंग पवार करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वनिप्ल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजु जाधव, अंमलदार महेश गाढवे, प्रमोद भोसले, विष्णु सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, बजरंग पवार यांच्या पथकाने केली.