मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती प्रत्येक क्षण हा चाहत्यांशी शेअर करत असते. ट्विंकल आपल्या मुलांसोबतचे फोटोही चाहत्यांशी सतत शेअर करत असते. ट्विंकल खन्नाने आपल्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत ट्विंकल लॅपटॉपवर काम करत असताना तिची मुलगी निताराही बेडवर उड्या मारताना दिसत आहे. यामुळे ट्विंकलला तिचे काम करण्यात अडथळे येत होते. हा व्हिडिओ शेअर करत ट्विंकलने आपली समस्या जाहीरपणे सांगितली आहे.
या व्हिडिओत ती आपल्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असताना दिसते. परंतु तिची मुलगी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये आपली समस्या व्यक्त करत लिहिले की, मुले घरात असताना काम करणे खूपच कठीण आहे. या व्हिडिओत त्रस्त झालेली ट्विंकल म्हणते की, तू माझ्या खोलीत असे का करत आहेस? का तुझा कोणताही क्लास नाही का? यावर नितारा ही आपल्या आईला इग्नोर करत असताना दिसते.
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. तसेच असंख्य चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स शेअर करत आहेत. यापूर्वी ट्विंकल खन्नाने आपली मुलगी निताराचा एक खूपच सुंदर असा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात नितारा ही पेट डॉगला आंघोळ घालताना दिसली होती.