मुंबई – बोलीववूडमधील स्टार किड्स आणि त्यांच्या पॅरेंट्स विषयीच्या अपडेटसची कायम सिनेसृष्टीत चर्चा असते. अनेकांना तर आपल्या स्टार पेक्षा त्याच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म दिवस केव्हा आहे याची अधिक माहिती असते. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव कुमार 20 वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत त्याचे आई-वडील त्याच्या खास दिवसासाठी खूप आनंदी आहेत. ट्विंकलने आपल्या मुलाच्या जन्म दिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत आपला मुलगा आरव याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटोमध्ये आरव एका रंगीबेरंगी फुग्यामागे हसत हसत पोज देत आहे.आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विंकल खन्नाने कॅप्शनमध्ये एक नोट लिहिली आहे. जी खूप भावनिक आहे. आणि तो २० वर्षांचा झाला या कॅप्शन खाली तिने भली मोठी पोस्ट लिहिली आहे. ट्विंकल खन्नाच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी आरवला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी तर या पोस्टवर कमेंट करत पार्टी कधी ? अशी विचारणा देखील केली आहे.
View this post on Instagram
आरव हा अशा स्टार किड्सपैकी एक आहे जो इंडस्ट्रीत क्वचितच दिसतो. यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये अक्षयने खुलासा केला होता की, त्याच्या मुलाला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. आरवला मी अक्षय कुमारचा मुलगा आहे, असे प्रसिद्धीसाठी लोकांना सांगायला फारस आवडत नाही, असेही त्याने सांगितले होते.