akshay kumar – अभिनेता अक्षय कुमारची पत्नी, अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसाला अभिनेत्री मुंबईत नसून ट्विंकल आपल्या कुटुंबासह सुट्टीवर आहे.
या हॉलीडेचे फोटो व्हिडिओ तिने इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने व्हिडिओमध्ये दाखवले आहे की ती तिचा वाढदिवस कसा साजरा करत आहे आणि तोही थोड्या वेगळ्या स्टाईलमध्ये. या व्हिडिओमध्ये ट्विंकलसोबत अक्षय कुमारही दिसत आहे.
View this post on Instagram
ट्विंकलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती अक्षय कुमारसोबत समुद्रात पाण्याखाली पोहत आहे. तिचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये तिने पाण्याखाली राहणाऱ्या जलचरांचे जग दाखवले आहे.
अक्षय कुमार आणि ट्विंकल दोघेही माशाप्रमाणे पाण्याखाली पोहताना दिसत आहेत. सोबतच ते अंडरवॉटर किस करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत ट्विंकल खन्नाने कॅप्शनही लिहिले की, ‘माझ्या 50 व्या वाढदिवसानिमित्त जेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या जगाकडे आणि माझ्या कुटुंबाकडे पाहते तेव्हा माझे डोळे आणि हृदय अजूनही आश्चर्याने भरून येते. ती पुढे लिहिते, ‘फक्त पोहत रहा.’ रोमांच कधीही संपू नये.’ सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील अक्षय आणि ट्विंकलची केमेस्ट्री सर्वाना आवडत आहे.