कर्जत – अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेला बारावी बोर्डाचा ऑनलाइन निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट कॅफेचा आधार न घेता विद्यार्थी तसेच पालकांनी मोबाईलवर निकाल पाहण्यास पसंती दाखवली. तालुक्यातील एकूण 3226 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील 3093 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 95.87 टक्के लागला.
कर्जतच्या समर्थ ज्युनिअर कॉलेजचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 96.26 टक्के लागला. विज्ञान शाखा- 98.50, कला 86.53, वाणिज्य 92.85. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत, सचिव वैभव छाजेड, संस्थेच्या निरीक्षक उषाताई राऊत, प्राचार्य युसुफ शेख, विभाग प्रमुख चंद्रकांत राऊत यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
शाखानिहाय प्रथम तीन विद्यार्थी असे: विज्ञान शाखा- प्रथम- आदित्य क्षीरसागर 89.38, द्वितीय- संकेत अनभुले- 89.23, तृतीय- स्वप्निल कपाळे -87.38, कला शाखा : प्रथम- विकास खराडे, सरवण व्हरकटे – 77.07, द्वितीय- गणेश पांडुळे- 76.92, तृतीय- अंजली जाधव – 76.30, वाणिज्य शाखा: प्रथम- शिवम सायकर- 77.38, द्वितीय- साक्षी सोनवणे -76.76, तृतीय- माधुरी खराडे- 75.23.
ुतालुक्यातील विद्यालयांचे शेकडा निकाल पुढीलप्रमाणे-
दादा पाटील महाविद्यालय, कर्जत- विज्ञान 98.83, कला 85.23, वाणिज्य 100, व्याव.100, महात्मा गांधी विद्यालय, कर्जत- विज्ञान 100, नूतन विद्यालय, मिरजगाव- विज्ञान 99.44, कला 84.90, वाणिज्य 98.36, डॉ. जी. डी. सप्तर्षी ज्युनियर कॉलेज, खेड- 75.43, नूतन मराठी विद्यालय, कुळधरण, विज्ञान 100, कला 78.26,जगदंबा विद्यालय.
राशिन- 100, सिद्धेश्वर विद्यालय, भांबोरा- 92.68, न्यू इंग्लिश स्कूल, कोंभळी-94.11, धाकोजी महाराज विद्यालय, निमगाव डाकू- 88.88, श्री अमरनाथ विद्यालय, कर्जत- विज्ञान 100, कला 91.42,व्याव. 74.19, समर्थ विद्यालय, कर्जत- विज्ञान 98.50, कला 86.53, वाणिज्य 92.85, स्व. वसंतदादा पाटील विद्यालय,अंबिकानगर- विज्ञान 97.43, कला 85.29, स्वानंद विद्यालय, चिंचोली काळदात- कला 77.77, श्री विठ्ठल विद्यालय,माहीजळगाव- 100, न्यू इंग्लिश स्कूल.
आंबीजळगाव- विज्ञान 96.07, कला 90.90, हशू अडवाणी विद्यालय, राशीन- विज्ञान 100, कला 96.92, आनंदराव फाळके पाटील कॉलेज, कर्जत- विज्ञान 100, सदगुरु कन्या विद्यालय, कर्जत- विज्ञान 100, कला 100, न्यू इंग्लिश स्कूल, कोरेगाव- विज्ञान 100, कला 81.48, उच्च माध्यमिक विद्यालय, राशिन- 100, महात्मा फुले नुतन ज्युनियर कॉलेज- 100, श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय- 100, छत्रपती ज्युनियर कॉलेज- विज्ञान 100, श्री रविशंकर जुनियर कॉलेज- विज्ञान 100, पंडित दीनदयाल उपाध्याय जुनिअर कॉलेज-100.