‘सर्वसामान्य जनता आपल्या सोबत, त्यामुळे मीच जिंकणार..’; एक्झिट पोलआधी निलेश लंकेंचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 । Nilesh Lanke : देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडले जात आहे. सातव्या टप्प्यासाठी 57 जागांसाठी 904 उमेदवार रिंगणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेकांनी मतदानाचा हक्क बजवाला आहे.
तर, दुसरीकडे निवडणुकीचे एक्झिट पोल हे काही तासात समोर येणार आहेत. या एक्झिट पोलच्या आकड्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. या निकाला संदर्भात प्रचंड उत्सुक्ता ताणली गेली आहे. वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की, “समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत होते. जवळपास दोन लाख मतांच्या फरकाने आपलाच विजय होईल. असा विश्वास लंके यांनी व्यक्त केलाय.
लंके पुढे म्हणाले की, “इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत, तर वाढतच आहेत. कारण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे असं म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सुजय विखे पाटीलयांना टोला लगावलाय. निवडणूक झाल्याबरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नसून जनतेसोबत असल्याचं म्हणत माझं दैनंदिन काम सध्या देखील सुरू असल्याचं त्यांनी म्हटल आहे.





