कर्करोगावर उपचारांसाठी कासवाची मदत

लंडन – कर्करोगावर रामबाण ठरेल असे औषध आजही सापडलेले नाही. मात्र, जगातील सर्वाधिक वयाच्या एका कासवाच्या मदतीने या असाध्य रोगावर उपाय ठरेल, असे औषध शोधण्यासाठी वैज्ञानिक एकवटले आहेत. ‘जोनाथन’ असे या कासवाचे नाव असून त्याचे वय 188 वर्षे आहे.

वाढत्या वयासोबत त्याच्या आरोग्यात होत असलेली सुधारणा पाहून वैज्ञानिकही संभ्रामात पडले आहेत. अटलांटिक महासागरात ब्रिटनच्या सेंट हेलेना बेटावर या कासवाचे वास्तव्य असून 1882 साली त्याला येथे ठेवले गेले.

त्याच्या दीर्घायुष्याबाबतचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असून त्यावरून मानवाच्या पेशीत होत नसलेल्या म्युटेशनमागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. म्युटेशनमुळे पेशींची वाढ होते व त्यामुळे कर्करोग होतो.

जर या कासवाच्या शरिरातील पेशी वाढत नसतील, तर त्याद्वारे मानवालाही कर्करोगापासून रामबाण औषध निर्माण करणे शक्य होणार आहे, असा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.