न्यूयॉर्क – सर्बियाचा जागतिक अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याने वेस्टर्न अॅण्ड मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली असली तरी हा विजय सोपा नव्हता.
तब्बल सात डबल फॉल्ट केल्यानंतर त्याने खेळ उंचावला व सामना जिंकला. जोकोविचला मानेच्या दुखापतीनेही बेजार केले होते. रिचर्ड बेरांकीस याच्यावर जोकोविचने 7-6 व 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला व दुसरी फेरी गाठली.
करोनाचा धोक्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी जोकोविचने आंतरराष्ट्रीय टेनिसचा सामना खेळला. मात्र, या विजयानंतर त्याने या स्पर्धेच्या दुहेरीच्या लढतींमधून मात्र माघार घेतली आहे.