चेन्नई – ऑनलाईन शिकवणी घेत असताना एका शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. या शिक्षिकेचा ऑनलाईन क्लासदरम्यान मृत्यू झाला आहे. केरळमधील कासारगोड येथे ही घटना समोर आली आहे. या शिक्षिकेला त्रास होत असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांना शेवटचे बघायचे होते त्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना तात्काळ कॅमेरे सुरु करण्यास सांगितले त्यानंतर शिक्षिकेने जीव सोडला. या घटनेने विद्यार्थ्यांना धक्काच बसला.
माधवी वय ४७ असे या शिक्षिकेचे नाव असून त्या कासारगोड जिल्यातील सरकारी कल्याण कनिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीला शिकवत होत्या. माधवी यांच्या मृत्यू झाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांनी घेतलेल्या शेवटच्या ऑनलाईन क्लासचे फुटेज तापसले त्यामध्ये हा ह्रदयद्रावक प्रकास समोर आला आहे.