शिवसेनेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न – जयंत पाटील

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसून शिवसेनेन याविरोधात मोर्चा काढला आहे. दरम्यान, पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात, की शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढलाय, मात्र मोर्चात सगळे मुंबईचे शिवसैनिक आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोडवला जाऊ शकतो, पण सरकारची मर्जी नाही. शिवेसना सत्तेत आहे, सत्तेत बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात हे बहुधा यांना माहीत नाही, पण नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत, असेही पाटील म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.