नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा; आरोग्य सुविधा सक्षम करण्याची मागणी

वाघोली – कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन मोलाची  कामगिरी करत असताना कोरोना रोगाने ग्रस्त असलेले रुग्ण आणि  त्यांचे नातेवाईक यांचे मोठे हाल होताना दिसत आहे. आरोग्य सुविधा तातडीने मिळवून देण्याची मागणी सध्या नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

“रेमडीसीव्हर बाबत योग्य निर्णय होऊन देखील  हॉस्पिटलकडे इंजेक्शनचा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शहर व ग्रामीण भागात इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे.आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी” – दादासाहेब सातव पाटील (उपाध्यक्ष,पुणे जिल्हा भाजप)

“पुणे शहर, व हवेली तालुक्यात सध्या रेमडीसीव्हरचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबाला या कठीण परिस्थितीत वणवण फिरावे लागत आहे. शासनाने तातडीने याबाबत लक्ष द्यावे व मदत करावी.”
संदीप सातव, (संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा)

“हवेली तालुक्यात  वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन व्हेंटिलेटर वाढवून मिळावेत.  तसेच हवेली तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी भर द्यावा तसेच कोविड सेंटर ची उभारणी करण्यात यावी.” – प्रदीप सातव पाटील (उपाध्यक्ष, हवेली तालुका भाजप)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.