अमेरिकेतील हिंसक आंदोलनाची जबाबदारी घेण्यास ट्रम्प यांचा नकार ;म्हणाले, “गोंधळामागील खरी समस्या माझं वक्तव्य नव्हतं तर “

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेत समर्थकांनी घातलेल्या हिंसक गोंधळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. युएस कॅपिटलमधील हिसेंनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या समोर येत डोनाल्ड ट्रम्प यांनी, “मी जे म्हणालो होतो ते पूर्णपणे खरं होतं असा लोक विचार करत आहेत.” असे म्हंटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘युएस कॅपिटलमध्ये झालेल्या गोंधळामागील खरी समस्या त्यांचं वक्तव्य नव्हतं, तर डेमोक्रेट्स द्वारे ‘ब्लॅक लाइव्ह मॅटर’ची आंदोलनं आणि सिएटल तसेच, पोर्टलँडमध्ये झालेल्या हिंसेच्या संबंधात करण्यात आलेली घोषणाबाजी होती.’राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ सात दिवसांपेक्षाही कमी शिल्लक आहे.

दरम्यान, संसदेत त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे. प्रतिनिधी सभेत ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई सुरु झाली आहे. बुधवारी यासंदर्भातील प्रस्तावाबाबत मतदान घेण्यात येणार आहे. या महाभियोगाच्या प्रस्तावात मावळत्या राष्ट्रपतींवर 6 जानेवारी रोजी ‘राजद्रोहासाठी उत्तेजित’ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये म्हटलं की, महाभियोगाच्या शक्यतेमुळे देशभरातून ‘खास राग व्यक्त’ केला जात आहे. परंतु, ‘हिंसा नाही’ नकोय. टेक्सासमध्ये मेक्सिको लगतच्या सीमेवरील भिंतीच्या पाहणीसाठी जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी माध्यमांशी बातचित केली. महाभियोगाच्या प्रश्नावर ट्रंप म्हणाले की,’ते जे करणार आहेत, ती अत्यंत वाईट गोष्ट आहे. आम्हाला हिंसा नकोय. कधीच नाही.’ असे सांगत ट्रम्प यांनी आंदोलनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.