आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीकुमारीचे ट्रम्पकन्या इव्हान्काकडून कौतुक

वॉशिंग्टन : आपल्या आजारी पित्याला सायकलवरून तब्बल 1200 किमी घेऊन जाणाऱ्या 15 वर्षीय भारतीय मुलीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का यांनी कौतूक केले आहे. हा प्रेम आणि सहनशक्तीचा उत्कृष्ट अविष्कार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे हरीयाणातील गुरगावमध्ये अडकलेल्या ज्योती यांचे वडील आजारी होते. पण वाहनांवरील बंदीमुळे त्यांना आपल्या गावी जाता येईना. ज्योती हीने त्यांना सायकलच्या मागील कॅरीयरवर बसवून बिहारमधील मूळ गावी नेले. त्यासाठी सात दिवसांत 1200 किमी सायकलींग केले.

या अठवीतील मुलीची ही प्रेरक कथा इव्हान्का यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. तिच्या या प्रवासाची समाजमाध्यमांतही प्रचंड चर्चा झाली होती.
15 वर्षीय ज्योतिकाने आपल्या जखमी वडिलांना घेऊन सायकलवरून 1200 पेक्षा अधिक किमी प्रवास केला. भारतीय लोकांच्या कल्पनातीत प्रेमाचा आणि सहनशक्तीचा उत्कट अविष्कार आहे., असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ज्योतरीकुमारीच्या या धाडसाचे सायकलींग फेडरेशन ऑफ इंडियाने कौतूक केले आहे. तति या चाचणीत यशस्वी ठरली तर तिचे आयुष्य बदलून टाकणारी संधी तिला ळिू शकते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×