वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 2021 मधील फोनवरील एक संभाषण उघड झाले आहे. त्यामध्ये ट्रम्प गोपनीय कागदपत्रांविषयी बोलत असल्याचे उघड झाले आहे.
आपल्याकडे काही गोपनीय कागदपत्रे आहेत. जी कागदपत्रे ट्रम्प यांनी आपल्याकडे असल्याचे जाहीर केले नव्हते, अशीच कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे ते बोलत असल्याचे या संभाषणातून उघड झाले आहे.
न्यूजर्सीतील एका पत्रकाराला ट्रम्प यांनी 2021 मध्ये फोनवरून एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्येच ट्रम्प यांच्या तोंडूनच या गोपनीय कागदपत्रांचा उल्लेख झाला आहे. हा ट्रम्प यांच्या वकीलांच्याविरोधातला एक महत्वाचा पुरावा ठरू शकतो.
एक लेखक, प्रकाशक आणि ट्रम्प यांच्या दोन कर्मचाऱ्यांना गोपनीय कागदपत्रे दाखवण्यात आली होती, असा आरोप ट्रम्प यांचे विशेष वकील जॅक स्मिथ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
विदेशातल्या एका विशिष्ट ठिकाणावर हल्ला करण्याची योजना असलेल्या पेंटॅगॉनच्या योजनेशी संबंधित ही कागदपत्रे होती. ही कागदपत्रे या लोकांनीच आपल्याला दिली होती, असे ट्रम्प यांनी संभाषणामध्ये म्हटले आहे.