ट्रम्प इम्रान यांच्याकडे डॉ.अफ्रिदींच्या सुटकेची मागणी करणार

वॉशिंग्टन – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील त्यावेळी अध्यक्ष ट्रम्प हे खान यांच्याकडे डॉ. शकील अफ्रिदी यांच्या सुटकेची मागणी करणार आहेत अशी माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली. डॉ अफ्रिदी यांनीच सीआयएला ओसामा बिन लादेनला शोधून काढण्यात मदत केली होती.

अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी डॉ अफ्रिदी यांचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. डॉ अफ्रिदी यांना कोणत्याही कोर्ट सुनावणीखेरीज तेथील तरूंगात खितपत पडावे लागले आहे. आपण अध्यक्ष झालो तर डॉ अफ्रिदी यांना आपण तुरूंगातून दोन मिनीटांत सोडवून आणू असे वक्तव्य अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या काळातही केले होते.

सन 2011 पासून डॉ अफ्रिदी तेथील कारागृहात आहेत. त्यांची त्वरीत सुटका करा अशी सुचना अमेरिकेने या आधी अनेक वेळा पाकिस्तान सरकारला केली आहे. पण त्याला अजून त्या सरकारने दाद दिलेली नाही. डॉ अफ्रिदी आमच्यासाठी हिरो आहेत असेही या अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे इम्रान खान यांच्या बरोबरच्या चर्चेत हा विषय ट्रम्प उपस्थित करणार आहेत असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)