Trisha Krishnan – साऊथ अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या चर्चेत आहे. त्रिशा अचानक चर्चेत आली जेव्हा तिचा सहकलाकार मन्सूर अली खानने तिच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. अभिनेत्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The context ….😡😡pic.twitter.com/n0ge3Qkzer
— Aryan (@chinchat09) November 18, 2023
वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होताच लोकांनी मन्सूर अली यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता त्रिशाने लिओच्या सह- कलाकाराच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून ती यापुढे कधीही त्याच्यासोबत काहीही करणार नाही असे म्हटले आहे.
त्रिशाने ट्विट केले की, “अलीकडेच एक व्हिडिओ माझ्या लक्षात आला आहे, ज्यामध्ये मन्सूर अली खान माझ्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. मी त्याचा निषेध करते आणि ते लैंगिकतावादी, अपमानास्पद आणि गैरवर्तनवादी वाटते. तो कदाचित माझ्यासोबत काम करण्याची आशा बाळगत असेल, पण हे माझे भाग्य आहे की मी त्यांच्यासारख्या तिरस्करणीय व्यक्तीसोबत काम करणार नाही आणि भविष्यातही असे न करण्याचा मी प्रयत्न करेन. त्यांच्यासारखे लोक माणुसकीला काळिमा फासणारे आहेत.” असं म्हणत तिने संताप व्यक्त केला.
यापूर्वी मन्सूर अली म्हणाले, “जेव्हा मला कळले की, मी त्रिशासोबत काम करत आहे, तेव्हा मला वाटले की हा बेडरूमचा सीन असेल. मला वाटले की मी त्रिशाला उचलून चित्रपटात तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन, जसे मी चित्रपटांमध्ये इतर अनेक अभिनेत्रींसोबत केले आहे. मी यापूर्वीही अनेक रेप सीन केले आहेत आणि हे माझ्यासाठी काही नवीन नाही. पण, या लोकांनी मला काश्मीरमध्ये शूटिंगदरम्यान त्रिशाला पाहूही दिले नाही.’ मन्सूर अलीच्या वादग्रस्त विधानावरून त्रिशाचे चाहते त्याच्यावर टीका केली आहे.