देशविरोधी कारवाया करू देणार नाही -संदीप मावा
श्रीनगर – राज्यातील अग्रणी व्यावसायिक आणि राजकीय कार्यकर्ते संदीप मावा यांनी बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेच्या जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या कार्यालयाच्या गेटवर मंगळवारी राष्ट्रध्वज फडकावला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप मावा आपल्या काही समर्थकांसह मंगळवारी श्रीनगरच्या बोहरी कडाल भागात पोहोचले. येथे त्यांनी जेकेएलएफ कार्यालयाच्या मुख्य गेटवर तिरंगा फडकावला. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यानंतर मोर्चाचे कार्यालय बहुतांशी बंद होते.
यावेळी संदीप मावा म्हणाले की, काश्मिरी लोक देशविरोधी कारवायांविरोधात ठामपणे उभे आहेत. मावा म्हणाले, “जेकेएलएफ 1960 च्या दशकापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते, ज्याचे नेतृत्व मकबूल भट, यासिन मलिक आणि बिट्टा कराटे यांसारख्या दहशतवाद्यांच्या हातात होते, आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संदीप मावा म्हणाले की, काश्मिरी मुस्लिम आणि पंडित मिळून एक नवे जम्मू आणि काश्मीर तयार करतील, जिथे शांततेच्या मार्गावर विकास आणि प्रगती होईल. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी मावाने राजबाग भागातील हुर्रियत कॉन्फरन्स कार्यालयाच्या गेटवर राष्ट्रध्वज फडकावला होता.